- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यशासनाचे प्रमुख असतात.
- विधानसभेत बहुमत मिळालेल्या पक्ष नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल अधिकृतरीत्या सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देतात.
- महाराष्ट्र राज्याला आजपर्यंत एकूण २४ मुख्यमंत्री लाभले आहेत.
- सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान वसंतराव नाईक ह्यांना जातो.
(सलग- ११ वर्ष २ महिने १५ दिवस)
- सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान शरद पवार ह्यांना जातो. (३ वेळा)
- सर्वात कमी कालावधी मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मन देवेंद्र फडणवीस ह्यांना जातो. (३ दिवस)
- पूर्वाश्रमीच्या मुंबई प्रांताला ३ मुख्यमंत्री लाभले
- बाल गंगाधर खेर (१९४७ ते १९५२)
- मोरारजी देसाई (१९५२ ते १९५६)
- यशवंतराव चव्हाण (१९५६ ते १९६०)
- महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२)
- महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे (२८ नोव्हेंबर २०१९ पासून आजपर्यंत)
====================
Video :
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी व माहिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~