Friday, February 22, 2019

महाराष्ट्राबद्दल माहिती_२




  • २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो तसेच क्षेत्रफळानुसार तिसरा क्रमांक लागतो.







  • महाराष्ट्राला पूर्व-पश्चिम लांबी ही ८०० किमी तसेच दक्षिणोत्तर लांबी ८०० किमी लाभली आहे. 






  • महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.








  • महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ३५१ पंचायत समित्या व ३४ जिल्हा परिषदा आहेत.






  • महाराष्ट्रात २६ महानगरपालिका, २३० नगर पालिका, १०४ नगरपंचायत व २७७०९ ग्रामपंचायती आहेत.






  • महाराष्ट्रात ४८ लोकसभा सदस्य, २८८ विधानसभा सदस्य, १९ राज्यसभा सदस्य आणि ७८ विधानपरिषद सदस्य आहेत.






  • महाराष्ट्राचा देशाच्या GDP मध्ये २३.२ % वाटा आहे.






  • २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण ८२.९ % आहे.






  • महाराष्ट्रातील मुंबई  हा सर्वाधिक तर नंदुरबार  हा  सर्वात कमी लोकसंखेचे जिल्हे आहेत.








  • "गोदावरी" ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.







  • सांगली जिल्ह्यातील "आष्टा" ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका आहे.






  • महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवरील "गंगापूर" हे आहे. 






  • "मुंबई" हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे.






  • भारतातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर येथील आहे.





  • "नांदेड" हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा आहे.





Video :




No comments:

Post a Comment