Friday, April 5, 2019

महाराष्ट्रातील भारतरत्न



  • भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सम्मान आहे.

  • देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या तसेच भारताची कीर्ती जगभरात वृद्धीन्गत करणाऱ्या व्यक्तीस प्राप्त होतो.



१.      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणप्रसारक व समाजसुधारक धोंडो केशव कर्वे ह्यांना १९५८ साली भारतरत्नाने सम्मानित करण्यात आले. ते महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती होते ज्यांना ह्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


२.      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणप्रसारक डॉ. पांडुरंग वामन काणे ह्यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल १९६३ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.


३.      भूदान चळवळीचे जनक तसेच समाजसुधारक आचार्य विनोबा भावे ह्यांना १९८३ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,


४.      भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना १९९० साली मरणोत्तर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..


५.      जगप्रसिद्ध उद्योजक व विमान उद्योगाचे जनक जे. आर. डी. टाटा ह्यांना १९९२ साली भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला.


६.      जेष्ठ व प्रसिध्द पार्श्वगायिका लता मंगेशकर ह्यांना २००१ मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.


७.      प्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी ह्यांना २००८ साली भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला.


८.      प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेले सचिन तेंडूलकर ह्यांना २०१४ साली खेळातील अमुल्य कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.


Video :



No comments:

Post a Comment