Tuesday, April 30, 2019

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व माहिती




  • महाराष्ट्राचा बहुतांश भाग ज्वालामुखी निर्मित बेसाॅल्ट ह्या खडकापासून बनलेला आहे.
राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खोऱ्यात आहे, त्यानंतर विदर्भ  व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो.


महाराष्ट्राची जमीन प्राकृतिक दृष्ट्या ऐकसारखी आहे तसेच पथारी क्षेत्र खूप मोते आहे



  • महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने ३ भाग पडतात.








सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र ह्या दरम्यान दक्षिणोत्तर पसरलेल्या लांब पट्टा म्हणजेच कोकण.






 दख्खनच्या पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे पश्चिम घाट .



महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली





सह्याद्री ची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे व ह्याची सरासरी उंची ९००-१२०० मीटर आहे.







  • पश्चिम घाट नद्या

पश्चिम घाट हा अनेक लहानमोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे.

यापैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी , कृष्णा व कावेरी

ह्या तीन ही नद्या पूर्ववाहिन्या असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात

तसेच इतर नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात

मुख्य पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी

इतर अनेक नद्या ज्या पश्चिम घाटात उगम पावतात त्यातील काही नद्या म्हणजे भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी इत्यादी आहेत..









Friday, April 5, 2019

महाराष्ट्रातील भारतरत्न



  • भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सम्मान आहे.

  • देशासाठी सर्वोच्च काम करणाऱ्या तसेच भारताची कीर्ती जगभरात वृद्धीन्गत करणाऱ्या व्यक्तीस प्राप्त होतो.



१.      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणप्रसारक व समाजसुधारक धोंडो केशव कर्वे ह्यांना १९५८ साली भारतरत्नाने सम्मानित करण्यात आले. ते महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती होते ज्यांना ह्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


२.      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणप्रसारक डॉ. पांडुरंग वामन काणे ह्यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल १९६३ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.


३.      भूदान चळवळीचे जनक तसेच समाजसुधारक आचार्य विनोबा भावे ह्यांना १९८३ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,


४.      भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना १९९० साली मरणोत्तर ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..


५.      जगप्रसिद्ध उद्योजक व विमान उद्योगाचे जनक जे. आर. डी. टाटा ह्यांना १९९२ साली भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झाला.


६.      जेष्ठ व प्रसिध्द पार्श्वगायिका लता मंगेशकर ह्यांना २००१ मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.


७.      प्रसिद्ध शास्त्रीय गायक भीमसेन जोशी ह्यांना २००८ साली भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला.


८.      प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रिकेटचा देव अशी उपमा मिळालेले सचिन तेंडूलकर ह्यांना २०१४ साली खेळातील अमुल्य कामगिरीबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.


Video :