Friday, March 15, 2019

रोल्स रॉईस बद्दल काही अजब-गजब माहिती




  • गाड्यांची महाराणी म्हणून ओळखल्या जाणारी रोल्स रॉईस कंपनीची स्थापना १५ मार्च १९०६ रोजी चार्ल्स रोल्स व फ्रेडरिक रॉईस ह्यांनी युनायटेड किंगडम येथे केली.


  • सिल्व्हर घोस्ट ही रोल्स रॉईस ची पहिली गाडी असून त्याच्या जवळपास ६०० गाड्या विकल्या.


  • रोल्स रॉईस ची प्रत्येक कार आजसुद्धा पूर्णपणे हातानेच बनवली जाते

  • रोल्स रॉईस मधे V12 हे अत्यंत शक्तिशाली इंजिन असल्यामुळे कार्स कधी बंद पडत नाहीत, आजवर बनवलेल्या एकूण गाड्यांपैकी ६५ % गाड्या अजूनही रस्त्यावर धावतात. 

  • १९८० मधे सर्वात प्रथम विकर्स ह्या कंपनीने आणि नंतर १९९८ मधे BMW ने रोल्स रॉईस विकत घेतली

  • २००३ मधे सादर करण्यात आलेली Rolls Royce Phantom ही कार ४४ हजार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

  • फॅन्टम ह्या मॉडेल मधे जवळपास २०० अल्युमिनिअम आणि ३०० इतर धातूंचे भाग हाताने जोडले जातात.

  • एक कार बनवायला साधारण २ महिने लागतात.

  • एक कार पेंट करायला कमीतकमी १०० पौंड रंग लागतो, कारला रंगाचे ५ थर दिले जातात.

  • एक कार पेंट करायला साधारणपणे ७ दिवसाचा कालावधी  लागतो.

  • प्रत्येक रोल्स रॉईस फॅन्टमच्या दरवाज्यामध्ये टेफ्लोन कोटेड छत्री असते, फक्त एक बटन दाबले कि ती बाहेर येते.


























रोल्स रॉईस च्या अजब-गजब माहितीचा व्हिडीओ नक्की बघा




Friday, March 8, 2019

महाराष्ट्रातील जिल्हे







महाराष्ट्र राज्यात आजमितीस एकूण ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ३५१ पंचायत समित्या व ३४ जिल्हा परिषदा आहेत..

  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर  हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे..

  • महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका आहेत.


महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची माहिती नक्की बघा-